जरी विषयी सुख होते

जरी विषयी सुख होते l तरी प्रेता का न होते ? ॥
गोड   वाटते    साखर । टाका बरे डोळाभर ? ॥
वर्म चुकलो सर्वजण । म्हणो विषय आनंदपूर्ण ॥
तुकड्या म्हणे आत आहे । तरिच बाहेरील वाहे ॥