सुख घ्या हो कोणी

सुख घ्याहो कोणी सुख घ्याहो कोणी । प्रत्यक्ष नयनी नयना दिसे ।
दिसे सुख-वस्तु आपलिया डोळा । परी बुद्धि चाळा नेघे त्याचा ॥
धाव घेई सदा दुःखी विषयांच्या । लाटा  त्या सुखाच्या भासे तये ।|
तुकड्यादास म्हणे साक्ष घ्या जाणीव । जाणपणी भाव दावी डोळा ।।