शांतीचीया घरा राहदी सर्वदा
शांतिचिया घरा राहसी सर्वदा । असोनी संपदा भीक मागे ॥
करे न पाहसी चित्त स्थिरवोनी ? । आहे तुझ्या स्थानी शांतिसुख ।।
कामना-डाकिणी आड उभी राहे । म्हणोनी न लाहे शांति अंगी ॥
तुकड्यादास म्हणे वैराग्याचे सरी । पावेल निर्धारी शांतिसुख।।