साधकाने वृत्ती आवरूनी आधी

२८. साधक-धर्म-प्रदीप
            (अर्थात गुरुपुत्र-लक्षणे)
                   आचार - विचार
साधकाने वृत्ति आवरूनी आधी । तोडावी उपाधि बाह्यसंगी ।
आहार विहार मितचि करावा । सत्वगुणी घ्यावा ग्रास मुखी ॥
निद्रे गांजू नये आळसा सोडावे । नियमांसी व्हावे सावधान ।।
तुकड्यादास म्हणे पाहू नये कोणा । दृष्टिचा निशाणा फेकोनिया ॥