छल द्रोह दुष्ट - भाव

छल द्रोह दुष्ट-भाव । यांचा करावा अभाव ॥
वृत्ति असावी सरळ । बाह्य अंतरी  निर्मळ ॥
सदा सत्य वाणी लाहो। प्राण जावो अथवा राहो ।।
तुकड्या म्हणे जो निर्मळ। त्यासी कापतसे काळ ॥