दया न करावी असत्याची अंगे
दया न करावी असत्याची अंगे । जेणे काम भंगे साधकाचे ॥
उग्ररूप वृत्ति धरावी बाहेरी । अंतरी विचारी शांत व्हावे ॥
ऐसे जव ना केले बुडेल परमार्थी । लोक लावी अर्थी संसाराच्या ॥
तुकड्यादास म्हणे पहा नाथ-ग्रंथी । चिरंजीव-पदी वाचोनिया॥