जग जनार्दन जाणुनी रहावे

जग जनार्दन जाणुनी रहावे । हित ओळखावे नित्यानित्य ॥
न करावे ऐसे कधी आचरण । जेणे बहुजन अपमानिती ॥
सत्याकरिता हाल अपेष्टा सोसावी । असत्याची शिवी त्रासदायी ॥
तुकड्यादास म्हणे हित-अहितासी । जाणोनी मानसी अभ्यासावे ॥