लौकीकाशी पुसू नये साधकाने

लौकिकासि पुसू नये साधकाने । आचरावे मने भावे देवा ॥
निंदा अथवा स्तुती जे का बघतील । तेचि नाडतील कर्माकर्मी ॥
एकांती लोकांती सदा ज्ञान-चर्चा । धनकामिनिच्या वार्ता नेघे॥
तुकड्यादास म्हणे या व्रती जो राही । तोचि सुख घेई पांडुरंगी ॥