कानोकानी कोणी सांगेल चहाडी

कानोकानी कोणी सांगेल चहाडी । चढू नये माडी हुंकाराच्या॥
करावा विचार आपुलिये मनी । पहावे निरखोनी कार्याकार्य ।।
चूक जे असेल करावे सहन । घ्यावे शहाणपण अंगामाजी ॥
तुकड्यादास म्हणे न चुकता कोणी । मनी समजुनी धन्य व्हावे ॥