तुम्ही संती कृपा केली ।

तुम्ही संती कृपा केली । म्हणुनी प्रेम या विठ्ठली ॥
जडले चित्त मनोभावे । बोध आमुचा बळावे  ॥
अंगी वैराग्य ये भर । फुटे भक्तीसी पाझर ॥
तुकड्या म्हणे उपदेशिता । रंग आला नाम गाता ॥