चहाडीने जिद्द बळावे अंतरी

चहाडीने जिद्द बळावे अंतरी । माझी चूक तरी सांगा कोणी ॥
मिळतसे धडा व्हाया सावधान । पुन्हा शहाणपण वाढो लागे॥
अंतर्बाह्य सर्व पापांचे क्षालन । आपले आपण करी तेणे ॥
तुकड्यादास म्हणे होऊ द्या चहाडी । धुवूनिया काढी दोष सर्व ॥