कृपा केली पूर्ण संती ।

कृपा केली पूर्ण संती । तरीच लाभली सुमति ॥
नाही तरी वेड्यावाणी । फिरत होतो रानोरानी ॥
श्वान सूकराच्या परी । वृत्ति होती दुराचारी    ॥
तुकड्या  म्हणे भाग्य धाले । संतचरण भेटले  ॥