जगा वैरी एक मनाची सर्वथा

जगा वैरी एक मनचि सर्वथा । त्यावीण अन्यथा वैरी नोहे ।
आधीच चेतवी करावया पाप । वाढवी संताप कलहाचा ॥
मना आधी कोणी वैरी न राहेचि । कारण मनचि प्रसंगासी ॥
तुकड्यादास म्हणे मन जया वश । तया पुरुषास वैरी नाही ॥