सर्व अनर्थासी मनची कारण

सर्व अनर्थासी मनचि कारण । दुजा दोषवून काय होते ? ॥
करोनी अभ्यास मन घ्यावे हाती । मग जावे पंथी सज्जनांच्या ॥
सर्व भावे    भक्ति   तरिच   घडेल । मन हे पडेल स्थिर होनी ॥
तुकड्यादास म्हणे ऐका श्रोते जन! । वश करा मन विवेकाने ॥