तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय करावे संतांनी ? ।
काय करावे संतांनी ? । नये बोध याच्या मनी ॥
किती करावा उपदेश ? । नाही वैराग्याचा लेश ॥
किती करावे कीर्तन ? । याचे विषयात मन ॥
तुकड्या म्हणे हा गवार । बोल देई संतावर ॥