तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
क्रोध नका करू तापेल शरीर
क्रोध नका करू तापेल शरीर । रोगाचे उंदीर आत शिरे ॥
शिरलियावरी निघेना लौकरी । वैराग्य-तुतारी न टोचता ॥
शहाणे व्हा मनी जाणा नित्यानित्य । व्यर्थचि आपत्य नका करू ।।
तुकड्यादास म्हणे क्रोधे नष्ट झाले । ऋषीही भ्रष्टले थोर थोर ।।