लोभाचा तो अंत

लोभाचा तो अंत न मिळे कोणासी । राजर्षी महर्षी सार्वभौमा ॥
किती द्यावे तरी किती द्यावे तरी । लोभासी न पुरी पडे केव्हा॥
लोभाच्या कारणे राज्य बुडविले । देशोधडी झाले साधुसंत ॥
तुकड्यादास म्हणे लोभ श्वानासम । त्यागुनी विश्राम भक्त पावे ॥