संती बोलीयेले ज्ञान

संती बोलियेले ज्ञान । कैसे आवरावे मन ।।
पहा वाणी ग्रंथांतरी । बोध साठवा अंतरी ॥
करा करा सदाचार । तोडा दुष्ट व्यवहार ।।
तुकड्यादास म्हणे ऐका । अनाचारे वागू नका ।।