सत्त्वगुणी वृत्ती असावी भक्ताची
सत्वगुणी वृत्ति असावी भक्ताची । तेणे अहर्निशी सुख राहे ।।
प्रमादी हा तम नसावा साधका । तेणे खाय धोका एकाएकी ।।
रजोगुणी भाव येऊ नये जिवी । आराम वाढवी आळसादि ॥
तुकड्यादास म्हणे नेहमी अभ्यास । चिंतनाचा ध्यास राहो चित्ता ॥