अभ्यासेची होते साधने साधना

अभ्यासेचि होते साधणे साधना । एकाएकी कोणा प्राप्त नोहे।
चंचल हे मन अभ्यासे     आवरे । गीतेमाजी बरे    बोधियेले ॥
पाहता अनुभव कळो येई सर्वां । करावया भावा धरू जेव्हा ।
तुकड्यादास म्हणे उड़ू नये जरा । अभ्यास आचरा उचित तो॥