चेतवावा अग्नी ज्ञानरूपी देही
निर्धार-प्रकाश (आद्य तयारी)
चेतवावा अग्नि ज्ञानरूपी देही । जाळाव्या संदेही वृत्ती सर्व ॥
सदा आनंदित रहावे निर्भय । करू नये हाय हाय स्वार्थी ॥
असेल ते मिळे आपुलाल्या दैवी । कासया करावी दुःखे देहा ॥
तुकड्यादास म्हणे चिंता करू नये । देव हा निर्दय नाही भक्ता ॥