करू नये चिंता आलिया

करू नये चिंता आलिया भोगाधी । निर्भय मनाची मुद्रा द्यावी॥
प्रारब्ध भोगावे लागे निरंतर" । ऐसा हा विचार दूढ व्हावा ।।
सत्याचा प्रयत्न कराया विवेके । पड़ नये फिके कार्य काही ॥
तुकड्यादास म्हणे नाशेल है सर्व । सत्याचाच जय अंती होई ॥