सकाळी चिंतावे शुभ चिंतवन

                          नित्यनेम
सकाळी चिंतावे शुभ चिंतवन । काय मी करीन सत्कर्मासी?।।
पाहू नये मुख त्या आधी कोणाचे । करावे प्रभुचे ध्यान आधी॥
धरावा निर्धार सत्य  -  कर्मत्वाचा । निश्चयो मनाचा   हर्षभरे ।।
तुकड्यादास म्हणे आनंदे उठावे । कर्म शुभ घ्यावे मनामाजी॥