झोपतांना यादी लिहावी कागदी

झोपतांना यादी लिहावी कागदी । पाहोनिया संधी झोपेचिये ॥
करावा आठव आपुल्या कर्माचा । दोष निर्दोष्याचा आढावाही ॥
काय माझे हाते घडलेसे पाप ? । कळे आपेआप आठवणी ॥
तुकड्यादास म्हणे दिसतांना चुकी । वैकुंठ - नायकी क्षमा भाकी ॥