वेडे वाकडे बोललो ।

वेडे वाकडे बोललो । परी मनी ना चिडलो  ॥
संगितले वर्तमान । जैसे आचरती जन  ॥
दुःख वाटे पाहतांना । अर्थ करिती भलते नाना ॥
तुकड्या म्हणे ऐसे नर । तया न कळे ते घर  ॥