संगतीने फिटे भ्रांति ।

संगतीने फिटे भ्रांति । शंका मनाच्या पळती ॥
लागे गोडी हरिनामाची । जोड मिळे सद्भावाची ॥
भाव भक्ति अंगी भरे । संतसंगाचे हे वारे   ॥
तुकड्या म्हणे लक्ष लावा । बोध अंतरी ठसवा ॥