दिली बुडी हिऱ्यासाठी I

दिली बुडी हिऱ्यासाठी । हाती आली गारगोटी ॥
संतसंग करू गेला । माने दंभचि वाढला  ॥
वापराया कैचे पाणी । गेले ओढ्याने वाहोनी ॥
तुकड्या  म्हणे फुटके भांडे । आले गेले सर्व सांडे ॥