दया करा दया करा ।

दया करा दया करा । म्हणुनी काय मिळे थारा? ॥
दावा आपुली पात्रता। दया कासयात नेता ॥
सर्व फाटुका पदर । षड्विकारे छिद्रे फार ॥
तुकड्या म्हणे दया सांडे । बोल का द्या संताकडे ॥