संती घातले दुकान I

संती घातले दुकान । माल हरिनाम कीर्तन ॥
जैसा जैसा भाव द्यावा । तैसा तैसा माल न्यावा ॥
बहु प्रकारीचा माल । फुका भेटे बहुमोल ॥
तुकड्या म्हणे व्हा सामोरी । न्यावा अधिकार-पदरी ॥