गावी असतील कुष्ठ रोगी तर
(चाल: पटातटाला फोडुनि आलिस...)
गावी असतील कुष्ठ रोगी तर जावुनि त्यांच्या घरा ।
मनोभावाने सेवा करा ।।धृo॥
भोग नसे तो रोगची आहे समज तया देउनी ।
म्हणा त्या घाबरतो का मनी ??
औषध मिळते जिकडे-तिकडे निष्ठा ठेउनि बरी ।
रोग हा मिटेल म्हण अंतरी ( अंतरा ) सांगतील जे-जे वैद्य तसा वाग तू ।
लपवूच नको हा रोग तया सांग तू ।
निश्चयास टिकवी सत्कर्मा लाग तू ।
मिटेल रोग नि हटेल संकट बोध तया मनि भरा ।
मनोभावाने सेवा करा 0॥१॥
क्षय रोगी अन् खरुज खुजेली लागट असतो महारोगाचे असले नसे ॥
दुरुस्त झाल्यावरहि कुणी जो घृणा तयाची करी ।
तयांची बुध्दि असे नासरी I
डॉक्टर ज्यांना देति मान्यता भीति तयांची नसे I
वावरू द्या त्यांना साहसे I
( अंतरा ) जीवनचि मिळते रोग-मुक्त होउनी ।
लपवुनी ठेविता रोग सुखी ना कुणी ।
हे सांगा ग्रामीणा सज्जनहो ! जावुनी ।
तुकड्यादास म्हणे ही सेवा मान्य असे सुरवरा ।
मनोभावाने सेवा करा 0 ॥२॥
-गुरुकुंज आश्रम, दि. २४-0४-१९६३