गड्या! संतापाशी जावे ।

गड्या! संतापाशी जावे । तरी ज्ञानचि मागावे ॥
पाहू नये त्याची थोरी । मन न करावे विकारी ॥
भाव धरावा अंतरी । बोध घ्यावा मनावरी  ॥
तुकड्या म्हणे संतापाशी । मिळे शांति अनायासि ॥