संतचरणा शरण जावे ।

संतचरणा शरण जावे । काय घ्यावयाचे घ्यावे ॥
पाहू नये गुण दोष । दोष लागती अंगास  ॥
पाहणारे पाहतील । फळ त्यांचे ते देतील  ॥
तुकड्या म्हणे व्यर्थ काळ । काय घालवीसी वेळ ॥