कोणा कासया म्हणावे ।

कोणा कासया म्हणावे । मूळ आपुले पहावे ॥
काय चुकते आपुले ? । काय सर्व ठीक झाले ? ॥
पहावा संतांचा उपदेश । लागू करुनी आपणास ॥
तुकड्या म्हणे ऐशा रिती । होय सज्जनांची प्रीती ॥