सर्व बोध संतापाशी ।

सर्व बोध संतापाशी । परी आम्हीच आळसी ॥
सांगे तैसे न आचरू । तरी कैसा पावे पारू ? ॥
नाही वेड आम्हा उरी । काय करी संत तरी ? ॥
तुकड्या म्हणे आचरावे । तरीच संतसंग पावे ॥