संती गाईली पुराणे ।

संती गाईली पुराणे । देव भेटे भक्ति ज्ञाने  ॥
ते तो न साधेचि कोणी । आयतेचि द्यावे मानी ॥
ऐसी कोण केली सीमा । मोडी निसर्गाच्या नेमा ?॥
तुकड्या म्हणे भाग्य त्याचे I पाय सापडे देवाचे ॥