वेळ काळ नाही त्यासी ।

वेळ काळ नाही त्यासी । देव राहे तयापाशी  ॥
सर्व जन तया देव। प्रेमा नांदतो सदैव  ॥
जनी वनी भासे तोचि । आनंदाचे ते स्थानचि ॥
तुकड्या म्हणे  माया नाही । सर्व विठ्ठलचि पाही ॥