तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
विदेहाची वार्ता कानी ।
विदेहाची वार्ता कानी । येता कापती ज्ञानी ॥
म्हणती वेडे यासी केले। सख्या आमुच्या विठ्ठले ॥
काही तरी हो चुकला । म्हणोनिया वेडा झाला ॥
तुकड्या म्हणे अपुल्यापरी । चाले जगाची वैखरी ॥