वैखरीची उच्चारिता ।

वैखरीची उच्चारिता । काही स्मरेना मान्यता ॥
ऐसा ज्याचा भाव झाला । त्याचा मनुष्यपणा गेला ॥
गणना त्याची निंदकात । दुरावले त्याचे मत  ॥
तुकड्या म्हणे चोखाळावे । तेव्हा नांव बोट द्यावे ॥