सगळे विचारे कळले ।

सगळे विचारे कळले । त्यासी अनुभवा आले ॥
आले तैसे सुख झाले । परमानंदे मन धाले ॥
भले फळले सुकृत । झाला पावन त्रिभुवनात ॥
तुकड्या म्हणे त्याची लीला। समाज बघता तृप्त झाला ॥