झाले तृप्त लोक तिन्ही ।

झाले तृप्त लोक तिन्ही । ज्या ही लाभली निशाणी ॥
ब्रह्मरूप त्याची वाणी । मिळे जनांच्या प्रमाणी ॥
सुखी होती सांसारिक । संता न कळताचि हाक ॥
तुकड्या म्हणे देव करी । भक्तजनांची चाकरी ॥