श्रुति स्मृतीचे पोवाडे ।

श्रुति स्मृतीचे पोवाडे । वेदगर्भीचे हे धडे   ॥
संती कथिले अभंगी । अर्थ दावोनी सर्वांगी ॥
सुगम केली भाषा-वाट । सहज समजावया नीट ॥
तुकड्या म्हणे कृपा केली । संती, वाट सोपी झाली  ॥