जनासाठी कष्ट केले ।

जनासाठी कष्ट केले । संती ग्रंथ उभारिले  ॥
परी कर्महीन आम्ही । आम्हा विषयांची उर्मी  ॥
कोणी वाचिना अभंग । त्यांच्या रुची येई भंग ॥
तुकड्या म्हणे वाहवा जन । नेले यमाने भोंदून ॥