संत गेलेती बोलून ।

संत गेलेती बोलून । दाखवूनि आचरून  ॥
तरी आम्ही वेडे जन । नाही आम्हा त्याचे भान ॥
धरू विषयांची आवडी । दुरजी नाहीच सवडी  ॥
तुकड्या म्हणे भोगतील । जे जे नाम ना गातील ॥