सांगा कीर्तन कैसे करू ? I

सांगा कीर्तन कैसे करू? । कैसे देऊ मी आधारू? ॥
नाही आम्हा ग्रंथज्ञान । नाही ठावेचि प्रमाण ॥
भोळी भक्ति तुम्हा जना । कैसी रुचेल सज्ञाना? ॥
तुकड्या म्हणे गीती गावे । प्रेमे आनंदे नाचावे ॥