करी पंढरीची वारी

करी पंढरीची वारी । धन्य धन्य तो संसारी ।
जया-द्वारी वृंदावन । तया येतसे विमान ।॥
जया गळा तुळसीमाळ । तया कापतसे काळ ।।
दास तुकड्या तो म्हणे । अंती देवासी भेटणे ॥