जन गाताति आपुले ।

जन गाताति आपुले । आम्ही तैशापरी केले ॥
आम्हा मार्गे जे जे दिसे । ते ते सांगो निर्भयसे ॥
कोणी करो न करो ध्यान । पाही देव तो वरून ॥
तुकड्या म्हणे जनासाठी । वाट केली नाही खोटी ॥