सरोनिया निद्रा दूर

सारोनिया निद्रा दूर । चैन न भोगी जो नर ॥
जाणे दया दुजियाची । तोचि जाणावा प्रपंची ॥
गरीबांची मुल बाळ । त्यांची घेतसे तळमळ ।।
तुक्या म्हणे गृहस्थाश्रमी । राहे राष्ट्राचा तो प्रमी ॥