आपणचि लिहिता शब्द ।

आपणचि लिहिता शब्द । वृत्ति होतसे नि: शब्द ॥
पाहता नेत्रांनी लेखणी । ध्यान लागे जनी मनी  ॥
वाचता शब्द अभिप्राव । अंगी उठे सात्विक भाव ॥
तुकड्या म्हणे गमे ऐसे । देवचि हे लिहितो दिसे ॥