जिकडे न्यावी ही लेखणी I

जिकडे न्यावी ही लेखणी । तिकडे शब्दांची मोहिनी ॥
कोण ओढी भराभर । जैसे धावते लेकुर ॥
आम्हा जरा शीण नाही । हर्ष वाटे या प्रवाही ॥
तुकड्या म्हणे जातो काळ । गमे अमृताची वेळ ॥