काय वाचू तुम्हापुढे ।

काय वाचू तुम्हापुढे । माझे ज्ञान हे कोरडे  ॥
केली सेवा वेड्यापरी । गोड करावी श्रीहरी! ॥
नाही व्याकरणी पुरा । नाही ज्ञान या पामरा ॥
तुकड्या म्हणे प्रेमभक्ती । तुज गाइले श्रीपती ॥